info@mycompany.io1-800-123-4567

    ध्रुवीय प्रदेशातील ‘हिम’संकट!

    • Home
    • Marathi Blogs
    • ध्रुवीय प्रदेशातील ‘हिम’संकट!

    लिड – औद्योगिकरणाच्या अतिरेकामुळे जागतिक तापमानवाढीची समस्या निर्माण झाली आहे. जगातील सर्व देशांना अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळण्याचा दुष्परिणाम त्यापैकी एक. आर्क्टिक आणि अंटार्क्टिकवरील बर्फाचे आवरण वेगाने वितळत आहे. बर्फाची पांढरीशुभ्र चादर घटत चालल्याने सूर्याची उष्णता परावर्तीत होऊ शकत नाही, ती शोषली जात आहे. मानवी इतिहासात कधीही न पाहिलेले आणि एक एक करून विक्रम मोडणारे हे भयानक संकट आहे.  

    ‘ती फूट अधिक रूंद झाली’, हवामान बदलाबाबतच्या दुष्परिणामाचे ठळक मथळे साधारण तीन वर्षांपूर्वी उत्तर अमेरिकेसह इतर ठिकाणी सर्व प्रमुख वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले होते. पण ती फूट

    पॅरिस हवामान करारासंदर्भात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उर्वरित जग, अशी नव्हती. तर मोठमोठे हिमखंड वितळून अंटार्क्टिकच्या पाण्यात कोसळण्याची ती फूट होती. बर्फाळ प्रदेशातील हा एवढा मोठा बदल इतिहासात कधीच पाहायला मिळाला नव्हता. कारणही तसेच होते. इस्रायलपेक्षा पाचपटीने मोठा, ४८,६०० चौरस किलोमीटर अंटार्क्टिकमधील ‘लार्सन सी’ नावाचा चौथा सर्वात मोठा हिमखंड अचानक तुटला. खर्या अर्थाने ही ब्रेकिंग न्यूज होती. तापमानवाढीमुळे हिमखंडाचा हा कडा एकाच वेळी अनेक किलोमीटरच्या परिसरातून तुटला होता. 

    नासा आणि ब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हेच्या शास्त्रज्ञांना गेल्या तीन दशकांत केलेल्या अभ्यासात निदर्शनास आले आहे की, लार्सन ए आणि बी या हिमखंडांचे लहान लहान कडे नाट्यमयरित्या वितळून कोसळत आहेत. तिन्ही हिमनगांपैकी सर्वात मोठा लार्सन सी आता २५ किलोमीटरच्या परिघात अशाचप्रकारे हळूहळू वितळत आहे. 

    दोन वर्षांपूर्वी विशाल हिमखंडापैकी एक असलेला A68 नावाचा हिमनग अंटार्क्टिकपासून तुटून वेगळा झाला होता. आपल्या आईपासून तुटून वेगळा झाल्यानंतर तो उथळ पाण्यात अडकला.  A68 हा जगातील सर्वात मोठे बर्फाचे बेट होण्याचा धोका होता. हा हिमखंड सुमारे एक ट्रिलियन वजनाचा आहे. शांत, शीतल हिमखंड जागतिक तापमानवाढीमुळे वितळून सैल झाला होता. 

    उपग्रहाच्या छायाचित्रावरून शास्त्रज्ञांनी या हिमखंडाचे वर्णन केले आहे. शास्त्रज्ञ सांगतात, हा हिमखंड १६० किलोमीटर लांब आणि २०० मीटर रूंद आहे. अगदी क्रेडिटकार्डच्या गुणोत्तरासारखाच. खर्या अर्थाने हे असे एक क्रेडिटकार्ड आहे, ज्याची डेबिट मर्यादा संपल्याने एटीएम मशिनमध्ये ते अजिबात चालणार नाही. लार्सन A, B, C हे हिमखंड मनमोहक आहेत. कारण अंटार्क्टिक बर्फाळ खंडातून तुटून वेगळे होणारे हे जगातील सर्वात मोठे हिमखंड आहेत. 

    १८८० मध्ये सुरू झालेल्या आधुनिक निरीक्षणानुसार, २०१८ हे जगातील सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदविले गेले आहे. २०१६, २०१५ आणि २०१७ ही वर्ष अनुक्रमे उष्ण राहिली आहेत. औद्योगिकीकरणापूर्वी म्हणजेच १८८० ते १९१० दरम्यान असलेल्या जागतिक तापमानाच्या पातळीवर ते तापमान आणायचे आहे. २०१८ साली जागतिक तापमान ठरवलेल्या ध्येयापेक्षा १.०६ अंशापेक्षा अधिक होते. त्यामुळेच २०१७ सालानंतर अल निनोचा प्रभाव नसतानाही २०१८ साल हे दुसरे सर्वाधिक उष्ण वर्ष राहिले. (अल निनो स्थितीमुळे उष्णता वाढू शकते, पण सर्वच पातळीवरील तापमान वाढेलच असे नाही.) २०१६ आणि २०१५ खूपच उष्ण वर्ष होते. गेली पाच वर्षे सर्वाधिक उष्ण वर्ष असल्याची नोंद झालेली आहे. गेल्या २२ वर्षांमधील २० वर्षे उष्ण राहिली आहेत. तापमानवाढीचे हे सातत्य कायम आहे. दरम्यान, १८ व्या शतकात झालेल्या औद्योगिक क्रांतीपूर्वी वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे असलेले २२८ पीपीएमच्या तुलनेत हरितगृह वायूचे प्रमाण ४११ पीपीएम इतके झाले आहे. 

    अमेरिकेतील बोल्डर, कोलोराडो येथील राष्ट्रीय हिम आणि बर्फ सांख्यिकी केंद्र यांनी अंटार्क्टिका खंडावरील हिमविस्ताराबाबत मोठी वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. वार्षिक ऋतूचक्रात हिवाळा आणि उन्हाळ्यात आर्क्टिक बर्फाचे आवरण विस्तारत आहे, तसेच आकुंचनही पावत आहे. परंतु याच परिसरात १४.४२ दशलक्ष चौरस किलोमीटरच्या परिघात सर्वात मोठ्या आकाराचा बर्फ झाला होता. १९७९ तील हिवाळ्यात बर्फाचा विक्रमी आकार पाहायला मिळाला होता. हिमखंड वितळत असल्याने समुद्राची पातळी वाढते असे नाही. आर्क्टिक आणि अंटार्क्टिकच्या मोठ्या भूभागावरील मोठे हिमखंड वितळून त्यांच्या हिमनद्या समुद्राला जाऊ मिळतात. परिणामी समुद्राची पाणीपातळी वाढते आहे. 

    आर्क्टिक आणि अंटार्क्टिक प्रदेशात कायम बर्फ असल्यामुळे त्या भागाला ध्रुवप्रदेशाकडील कायम गोठलेली जमीन असे म्हणतात. या भागातील बर्फ वितळण्याचा परिणाम अनेकांच्या लक्षात आलेला नाही. जागतिक तापमानवाढीमुळे या प्रदेशातील बर्फ नेहमीच्या प्रमाणापेक्षा २० टक्के अधिक प्रमाणात वितळेल, असा निष्कर्ष नेचर क्लायमेट चेंज संस्थेच्या एका अभ्यासात काढण्यात आला. पृथ्वीच्या वातावरणात बर्फाच्या आवरणाखाली लक्षणीय प्रमाणात मिथेन हा हरितगृह वायू (जो कार्बन डायऑक्साईडहून अधिक तापमानवाढीला कारणीभूत ठरू शकतो.) साचलेला असतो. बर्फ वितळल्याने सूर्याची उष्णता परावर्तीत होऊ शकत नाही, ती शोषली जात आहे. मानवी इतिहासात कधीही न पाहिलेले आणि एक एक करून विक्रम मोडणारे हे भयानक संकट ओढावले आहे.

    आर्क्टिक परिसरात ग्रीनलँडसारखे देश आहेत. या देशात जवळपास ३५ दशलक्ष लोक वास्तव्य करतात. मोठ्या प्रमाणात बर्फ वितळत असल्यामुळे येथील जमीन अस्थिर झालेली आहे. येथील रस्ते, घरे, इमारती कोसण्याचा धोका निर्माण झाला आहे. हरितगृह वायूच्या उत्सर्जनाने आर्क्टिक प्रदेशात जगाच्या तुलनेत दुपटीने तापमानवाढ होत आहे. समुद्राची पातळी वाढत चालल्याने किनारपट्टी भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू झाले आहे. यातून जैवविविधतेचेही मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. बर्फाळ प्रदेशात राहणार्या समुदायांचा वारसा आणि संस्कृती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 

    जागतिक तापमानवाढीचा आणखी एक तोटा म्हणजे विषुववृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे उलटे स्थलांतर होत आहे. अतिरिक्त कार्बनडाय ऑक्साईडच्या उत्सर्जनामुळे समुद्र खवळलेला आहे. हवामान बदलाच्या चढ-उतारामुळे कधी दुष्काळ तर, कधी पूर परिस्थिती निर्माण होत आहे. टास्मानिया विद्यापीठाच्या संशोधकांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका विश्लेषणानुसार, या परिस्थितीमुळे जमिनीवरील जैवप्रजाती सरासरी १७ किलोमीटर प्रतिदशक तर, समुद्रातील प्रजाती ७२ किलोमीटर प्रतिदशक ध्रुवीय प्रदेशाकडे सरकत आहेत.

    मार्च २०१७ मध्ये द न्यू सायन्टिस्ट मासिकाच्या म्हणण्यानुसार, प्राण्यांचे रक्त शोषून घेणार्या किटकापासून लाइम आजाराचा प्रादुर्भाव होतो. या आजाराची व्याप्ती वाढून तो प्राणी आणि माणसांमध्ये यापूर्वी धोका नसलेल्या भागात उद्भवू शकतो. तापमानवाढीचा हासुद्धा धोका आहेच. समुद्राची पातळी तसेच तापमान वाढल्याने इतर प्रजाती आणि त्यांचा त्यांच्या अधिवासाच्या जागा धोक्यात आल्या आहेत.

    नुकत्याच झालेल्या एका विज्ञान संशोधनानुसार, सध्याच्या तापमान वाढीमुळे (फक्त १ अंशाने) ९४ पैकी ७७ विविध प्रजातींवर आणि पर्यावरणीय प्रक्रियेवर परिणाम झालेला आहे. हवामान बदलामुळे माणसामध्ये अनुवांशिक बदल होण्यासह शरिरातील म्हणजेच शरिराचा आकार आणि वैशिष्ट्यांमध्ये बदल संभवतात.  

    हवामान बदलाचा मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे, असा अभ्यास अमेरिकेच्या मानसशास्त्र संघटनेने (एपीए) केला आहे. त्यामध्ये वैयक्तिक आणि व्यावसायिक ओळख विसरणे, नियंत्रणाची भावना गमावणे, कोणीतरी आपला प्राण घेत आहे अशी भीती निर्माण होणे, अशा मानसिक त्रासांचा समावेश आहे. या मानसिक अधोगतीसाठी महासत्तेचे मोठे नेते आणि त्यांना निवडून देणारे आपण सगळेच जबाबदार आहोत.


    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *