प्रकाशजी जावडेकर ही ‘पब्लिक अनलिमिटेड’ कंपनी आहेत, असे मला प्रकर्षाने वाटते. मी त्यांना एक तपाहून अधिक काळापासून ओळखतो. प्रत्येक वेळी जेव्हा मी त्यांना भेटतो तेव्हा मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक नवीन आयाम दिसतो.
—
डॉ. राजेंद्र शेंडे
पर्यावरण, शिक्षण आणि माहिती-प्रसारण या तिन्ही खात्यांचा कारभार सांभाळणारे जगातील एकमेव मंत्री कोण आहेत? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर येईल प्रकाश जावडेकर. तथापि, याचे श्रेय जगातील एकमेव दूरदर्शी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते. ज्यांनी या तीन क्षेत्रांमधील अतूट नातेसंबंधाची कल्पना केली. शिक्षणाशिवाय पर्यावरण विषयक जागरूकता शक्य नाही आणि प्रसारणाशिवाय माहिती प्रसारित करून पर्यावरण संरक्षण अशक्य आहे.
मी जगातील ८० हून अधिक पर्यावरण मंत्र्यांना त्यांच्याच देशात भेटलो असेल. जावडेकरजींचे कार्यालय हे एकमेव कार्यालय आहे जे मी पाहिले की जगातील १९६ देशांतील प्रत्येक पर्यावरण मंत्र्याकडे असावे. त्यांच्या कार्यालयात एक डिजिटल डॅशबोर्ड होता. भारतातील प्रमुख उद्योगांमधील सांडपाणी प्रदूषण पातळीचे ऑनलाइन आणि रिअल टाइम ट्रेंड त्यावर प्रदर्शित केले जात होते. त्यांच्याकडे उद्योग बंद करण्याचा अधिकार होता. या डॅशबोर्डवरील ३ इशाऱ्यांनंतर हे स्पष्ट होते की, संबंधित उद्योग हा प्रदूषणकारी आहे आणि तो ‘अस्वीकारण्या योग्य’ पातळीवर आहे. म्हणजेच, त्यांनी तंत्रज्ञानाचा अतिशय चपखल वापर आपल्या कामासाठी केला आहे.
ग्रीन तेर फाऊंडेशनची मी स्थापना केली आहे. या संस्थेने जागतिक उपक्रमांतर्गत युनिव्हर्सिटी कॅम्पसमधून कार्बन उत्सर्जनाच्या ऑनलाइन आणि रिअलटाइम मापनासाठी डिजिटल डॅशबोर्ड आणला. त्याचे लॉन्चिंगही जावडेकर यांच्या हस्ते झाले आहे.
जावडेकर हे कट्टर कार्यकर्ता आहेत. त्यांच्या निवासस्थानातील कार्यालयात दोन नेत्यांचे मोठे फोटो आहेत. ते म्हणजे अटलजी आणि मोदीजी. देशसेवेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या व्यक्तींप्रती त्यांचा हा आदर आहे.
भारतात वाघांची संख्या स्थिर आणि वाढवण्यात तसेच २०१५ च्या पॅरिस हवामान कराराच्या यशस्वी वाटाघाटींमध्ये जावडेकरांचे योगदान अतिशय महत्त्वाचे होते. हा करार केवळ भारतालाच नव्हे तर आपल्या संपूर्ण पृथ्वीला लाभदायक ठरेल. अमेरिकेचे हवामान दूत जॉन केरी यांच्याशी त्यांचे वैयक्तिक समीकरण अतिशय सौहार्दपूर्ण होते. पॅरिसमधील COP21 दरम्यान जॉन केरींचा वाढदिवस होता. हेच केरी ज्यांनी २०१५ च्या हवामान कराराला जन्म दिला. जावडेकर यांनी जॉन केरी यांना मोठा पुष्पगुच्छ सादर केला. मी पाहिलेला हा दुर्मिळ प्रोटोकॉल म्हणावा लागेल.
जावडेकरजींचा आज वाढदिवस. त्यांना खुप खुप शुभेच्छा. यापुढील त्यांचे आयुष्य निरामय आणि आनंददायी जावो, हीच प्रार्थना.
Leave a Reply